चलो अमरावती! चलो अमरावती!!
*रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 सकाळीं 11.00 वाजता.*
*मोर्चाचा मार्ग नेहरू मैदान, राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गर्ल हायस्कूल चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय.*
📮प्रमुख मागण्या 📮
1) खाजगीकरण व कंत्राटीकरणं तात्काळ बंद करा.
2) सर्व कर्मचारी व अधिकारी यांना 1982 चीच जुनी पेंशन लागू करा.
3) शासकीय नोकरीतील रीक्त पदे तात्काळ भरा.
4) शाळा दत्तक योजना ,समूह शाळा योजना बंद करा.
5) मागासवर्गीयांना तात्काळ पदोन्नती मधील आरक्षण लागू करा.
6) सर्व शासकीय विभागातील पदभरती करिता स्पर्धा परीक्षा निःशुल्क घेण्यात यावी.
7) सर्व विभागातील कंत्राटी व मानधन तत्वावर लागलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना शासकीय नोकरीत सामावून घ्या.
8) शेतकरी व शेतमजुरांना स्वामिनाथन आयोग लागू करा.
9) EPS 1995 मधील सर्व कर्मचाऱ्यांना किमान 9000 पेंशन व महागाई भत्ता देण्यात यावा.
10) सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ व नियमित करावी.
सदर मागण्या साठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ संघ सदर आंदोलन मध्ये सहभागी आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील अखिल चे सर्व शिलेदारांनी या मोर्चा मध्ये सम्पूर्ण ताकदीने सहभागी व्हावे ही विनंती .*
सहभागी होतांना सर्वानी डोक्यात ज्यांचेकडे टोपी व टी शर्ट आहे त्यांनी ते परिधान करून सहभागी व्हावे.
*पिण्याची पाण्याची बॉटल सोबत ठेवावी.*
पार्किंग ची व्यवस्था नेहरू मैदान मध्येच केली आहे.
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती जिल्हा संघाचे सर्व पदाधिकारी , कार्यकारणी सदस्य आणि सभासद, सर्व तालुका अध्यक्ष व सचिव आणि सर्व तालुका कार्यकारणी व सर्व सभासद, अखिल परिवारातील सर्व सम्माननिय सदस्य, सर्व विभाग चे कर्मचारी मोठ्या संख्येने dcps/nps धारक यांनी सहभागी व्हावेत, ही विनंती.*
कृती समितीचे वतीने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ अमरावती द्वारा आवाहन.
👏आपलेच विनीत👏
*किरण पाटील, राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, जिल्हा सरचिटणीस सुभाष सहारें, जिल्हा कार्याध्यक्ष संजय साखरे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई उभाड, प्रमोद घाटोल, संजय वाटाणे, ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव देशमुख, नीलकंठ यावले, राजेंद्र होले, सतिश गुजरकर*
*जिल्हा प्रमुख महिला सुनीताताई पाटील, जिल्हा समन्वयक वृषाली देशमुख.*
प्रसिद्धी प्रमुख. 🙏सूरज मंडे🙏 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती.*
Comments
Post a Comment